जालना : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने भूजल पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहेत. यावर्षी मोजण्यात आलेल्या भूजल पाणी पातळी ०.२२ मीटरने कमी झाली आहे. परिणामी, येणाऱ्या काळात चांगला पाऊस न झाल्यास ही पातळी आणखीच खोल जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जिल्ह्यावर गेल्या काही वर्षापासून वरुणराजा रुसला आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात केवळ दोन वर्ष चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. परिणामी आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला. तर यावर्षी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या ०.२२ ने पाणी पातळीत घट झाली आहे.
यावर्षी भूजल सर्व्हेक्षण विभागाने ११० विहिरातून भूजल पाणी पातळी मोजली आहे. यात भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ०.६१ मीटरने घट झाली. तर परतूरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ०.३ मीटरने घट झाली तसेच मंठ्यात ०. ०४ मीटरने घट झाली आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस न झाल्यास ही भूजल पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता भूजल सर्व्हेक्षण विभागाने वर्तवली आली.
पाऊस नसल्याने परिणाम झाला जिल्हाभरात जलयुक्त शिवाराची काम झाल्याने भूजल पाणी पातळीत मागील वर्षी वाढ झाली होती. परंतु, सध्या पाऊस नसल्याने भूजल पाणी पातळीत घट होत आहे. यासाठी चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.- बी. एस. मेश्राम, वरिष्ठ भुवैज्ञानिक, भूजल संरक्षण आणि विकास यंत्रणा
तालुकानिहाय भूजल पातळीतालुका घट (मीटर)अबंड ०.०१बदनापूर ०.३४भोकरदन ०.६१घनसावंगी ०.२८जाफराबाद ०.१५जालना ०.३५मंठा ०.०४परतूर ०.०३