लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी मामा चौक येथे जिल्ह्यातील भारनियमन बंद करणे, पेट्रोल - डिझेल व स्वयंंपाक गॅस चे वाढलेले दर त्वरीत मागे घेणे यासह जालना जिल्हा दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार निदर्शने करण्यात आली.भाजपाचे केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकरी आणि कष्टकरी जनतेस वेठीस धरत आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात आली नाही. बोंडअळीचे अनुदान रखडले आहे. ऊलट जिल्ह्यात भारनियमन सुरू झाल्याने सामान्य जनता हैराण झालेली आहे. राज्य सरकारने या समस्या त्वरीत सोडवाव्यात म्हणून अशी मागणी करत जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मामाचौक येथे भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला.या आंदोलनामध्ये पेट्रोल- डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे वाढलेले भरमसाठ दर मागे घेण्यात यावे.मोदी सरकारच्या विरोधात घोषणाचे फलक युवकांनी हातात घेतले होते.यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी खा. तुकाराम रेंगे , प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, भीमराव डोंगरे, विजय कामड, डॉ. संजय लाखे पाटील, आर. आर. खडके, ज्ञानेश्वर भांदरगे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राख, राजेश राठोड, डॉ. जितेंद्र देहाडे, विजय चौधरी, वसंत जाधव, बदर चाऊस, आनंद लोखंडे, शेख शमशु, राम सावंत, अॅड. संजय खडके,जीवन सले, वैभव उगले, शिवराज जाधव, संजय शेजूळ, राहुल हिवराळे, आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. आंदोलनाच्या प्रारंभी मुख्य संयोजक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी प्रस्ताविक भाषणातून केंद्र आणि राज्य सरकार विरूद्ध टिका करून पेट्रोल - डिझेल व स्वयंपाक गॅसचे वाढलेल्या दराबद्दल आणि जालना जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यात यावा आदी मागण्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी शेषराव जाधव, इब्राहीम कायमखानी, देवराज डोंगरे, जावेद बेग, जुनेद खान, महेश दसपुते, नवीद अख्तर, राहुल वाहुळे, शेख सईद, जहीर यारखान, रवींद्र गाढेकर, मोबीन खान आणि मोहसिन पठाण, गणेश खरात, कृष्णा पडूळ, दत्ता शिंदे, संतोष देवडे, अरूण घडलिंग, नगरसेवक जीवन सले, महावीर ढक्का, रमेश गौरक्षक, राज स्वामी, आरेफ खान, संजय भगत, विनोद यादव, राधाकिसन दाभाडे, रोहीत बनवस्कर, बालकृष्ण कोताकोंडा, राहुल हिवराळे, वाजेद खान, अरूण मगरे, विनोद रत्नपारखे, गोविंदप्रसाद बोराडे, आशिष सामलेट, जावेद अली, वसीम कुरेशी, शेख अफसर, सरफराज बाबा, शेख वसीम, आकाश लाखे, इत्तेशाम मोमीन, नदीम पहेलवान, अफजल सौदागर, मनोज गुढेकर, रमेश भालेराव, सि. के. डोईफोडे, अजीज बिनसमेदा आदी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.भारनियमन बंद करा४यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी बोलतांना सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारने इंधन दरवाढ मागे ध्यासह दुष्काळ जाहिर न केल्यास युवक काँग्रेस राज्यात मोठे आंदोलन उभे करेल यासाठी हे सरकारच जबाबदार असेल, असा इशारा तांबे यांनी दिला. नुकतेच भारनियमन सुरू केल्यामुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे. भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे नसता वेळप्रसंगी मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.
जालना जिल्हा युवक काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:42 AM
जालना जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी मामा चौक येथे जिल्ह्यातील भारनियमन बंद करणे, पेट्रोल - डिझेल व स्वयंंपाक गॅस चे वाढलेले दर त्वरीत मागे घेणे यासह जालना जिल्हा दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार निदर्शने करण्यात आली.
ठळक मुद्देभारनियमन बंद करा : जालना जिल्हा दुष्काळ जाहीर करा, इंधन दर मागे घ्या