शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जालना जिल्ह्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:40 AM

जालना शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढच होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाचा पारा वाढू लागल्याने सर्वत्र तप्त वातावरण आहे. याचा मोठा फटका शेती कामालाही बसल्याचे दिसून आले. जालना शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढच होत आहे. यामुळे एकूणच जनजीवनावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर कडक ऊन पडत असल्याने प्रचारावरही त्याचा परिणाम होत आहे. बहुतांश उमेदवार आणि त्यांचे समर्थक हे सायंकाळी चार नंतर आणि सकाळी ११ च्या आत प्रचार उरकून घेत असल्याचे चित्र आहे. प्रचारा सोबतच दररोज गर्दीने फुलणारने रस्ते दुपारी एक ते पाच यावेळेत ओस पडलेले आहेत. दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनेकजण घराच्या बाहेर न पडणेच पसंस करत असल्याचे दिसून आले.सध्या जे काही नागरिक त्यांच्या कामानिमित्त बाहेर पडत आहेत, ते सर्वजण पांढरा गमछा बांधून आणि डोळ्यांना गॉगल्स घालूनच बाहेर फिरताना दिसत आहेत. पांढरे कापड वापरणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. जालन्यात पांढरे कापड घालणे म्हणजे जास्तीत- जास्त तीन तासात ते धुळीने माखलेले असते. त्यामुळे पांढरे कपडे हे जालन्यात ज्यांच्याकडे प्राधान्याने चारचाकी गाडी आहे, तेच जास्त वापरत असल्याचे दिसून आले.अनेक रस्त्यावर तर आता पूर्वीप्रमाणे गडद सावली देणारे झाडे देखील नामशेष झाले आहेत. सावली शोधूनही मिळत नसल्याचे वास्तव आहे.ऐन कडक उन्हाळ्यात जालनेकरांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. एकूणच वाढत्या उन्हामुळे थंडपेयाची विक्री वाढली असून, द्राक्ष, कैरी, टरबूज, खरबूज यांना मोठी मागणी असून, अननसही बाजारात दाखल झाले आहेत.दक्षता घ्यावीघराबाहेर पडताना पांढरा रूमाल बांधूनच बाहेर पडावे.डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्सचा वापर करावा.सुती व सैलदार कपडे वापरावे. जेणेकरून उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल.तहान नसतानाही जास्तीचे पाणी प्यावे.दुपारी १२ ते ५ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.कृत्रिम थंडपेयांऐवजी दही, लिंबू शरबत, ताक, उसाचा रस, कैरीचे पन्हे आहारात नित्य घ्यावे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमानHealthआरोग्य