जालना : जालना येथील उद्योगांना पाण्याची तीव्र टंचाई जाणत असून, आज सर्वात जास्त पाणी हे येथील स्टील उद्योगांना लागते. मात्र पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर विकतचे टँकर घेऊन उद्योग चालवण्याची वेळ आली आहे. जालना येथील एमआयडीसीसाठी शेंद्रा येथून स्वतंत्र पाईपलाईन टाकली असून, त्यातून सहा एमएलडी सोडाच परंतु एक एमएलडीही पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.जालना शहरातील सर्वात मोठा उद्योग म्हणून स्टीलकडे पाहिले जाते. अत्यंत उच्च वीज दाबावर स्टीलचे उत्पादन होते. हे झालेले उत्पादन लगेच थंड करण्यासाठी या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. परंतु गेल्या काही वर्षापासून या भागात पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेकांनी स्वत:चे पाणी पुनर्वापर प्लांट उभारले असून, काही उद्योजकांनी शेततळे तसेच विहिरींचे अधिग्रहण केले आहे. या माध्यमातूनच सध्या उद्योग सुरू असल्याने येत्या काही दिवसात स्टील उद्योजकांवर उत्पादन कपातीची वेळ येणार आहे.जालना येथे स्टीलचे जवळपास सात मोठे प्लांट सुरू असून, त्यांना दररोज लाखो लिटर पाणी लागते. या स्टील उद्योगांचे पुरक उद्योग म्हणजे रोलिंगमिल असून, त्यांनाही तेवढेच पाणी लागत असल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे. जालना येथील एमआयडीसीकडून जालन्यातील उद्योगांना पुरेसास पाणीपुरवठा व्हावा यासाठी शेंद्रा येथून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. मात्र, तेथून कधीच पूर्ण क्षमतेने पाणी आलेले नाही. आता उद्योगांसाठी पुन्हा एकदा नव्याने ३०० कोटी रूपये खर्च करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार असून, पैठण येथील नाथसागरातून शेंद्रा येथील एमआयडीसीत हे पाणी आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. परंतू हे नियोजन गेल्या काही वर्षापासून कासव गतीने सुरू आहे.जिल्ह्याला : ३०० टँकरद्वारे पाणीजालना जिल्ह्यात पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. याचा परिणाम टँकरच्या फेऱ्या वाढीवर झाला असून, १५ मार्च पर्यंत जिल्ह्यात ३०१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अद्याप आठही तालुक्यांमधील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. एकूणच यंदाच्या उन्हाळ्यामध्ये टँकरची संख्या ही पाचशेपेक्षा अधिक होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्यावर्षी संपूर्ण उन्हाळ्यामध्ये केवळ १५४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. यामुळे यंदा टँकरवर लाखो रुपयांचा खर्च होणार आहे.
जालन्याच्या औद्योगिक वसाहतीत पाणीबाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:50 PM
जालना येथील उद्योगांना पाण्याची तीव्र टंचाई जाणत असून, आज सर्वात जास्त पाणी हे येथील स्टील उद्योगांना लागते. मात्र पुरसे पाणी मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर विकतचे टँकर घेऊन उद्योग चालवण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देटँकरवरच भिस्त : पिण्यापुरतेही पाणी मिळेना, सर्वात मोठा फटका स्टील उद्योगाला, एमआयडीसीने लक्ष घालावे