लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना औरंगाबाद मार्गावरील औद्योगिक टी पॉईंटवर दिवसें- दिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. वर्षभरात या ठिकाणी २० अपघात झाले असून १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी रात्री ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण जखमी झाल्याने परिसर हादरून गेला होता.जालना औरंगाबाद महामार्गावर दिवसभऱ्यातून हजारो वाहनांची वर्दळ असते. औरंगाबाद आणि जालना औद्योगिक वसाहतीचा दिवसें - दिवस विस्तार वाढत असल्याने जड वाहनांची या महामार्गावर वर्दळ वाढली आहे. यामूळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील औद्योगिक टी. पॉईंटवर वर्षभरात २० अपघात झाल्याचे माहिती आहे. यामध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे या मार्गावर टी पॉईंटपासून हाकेच्या अंतरावर महामार्ग पोलीस ठाणे आहे. मात्र त्यांच्याकडून खबरदारी म्हणून कुठलीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्पीड ब्रेकर नाहीत, तसेच झेब्रा क्रॉसिंगच्या पट्या मारलेल्या नाहीत, सौरउर्जेवर लुकलुकणारे लाल दिवेही परिसरात नसल्याने अपघात वाढत चालले आहेत. टोल वसुली करणाऱ्या संबंधित एजन्सीकडूनही रस्त्याच्या दुरुस्तीसह विविध सुविधा पुरविण्यास दिरंगाई होत आहे.गतिरोधक गरजेचेऔद्योगिक टी पॉईंटवर परिसरात वाढते अपघात बघता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परिसरात स्पीडब्रेकर, रस्त्यावर झेंब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करणार आहे. तसेच परिसरात रात्रीची पोलिसांची गस्त वाढविणार आहे.- एस. आर.कौठाळे,पोलीस निरीक्षक, चंदनझिरा
जालना औद्योगिक टी पॉईट ठरतोय मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:46 AM