मागील आठवड्यात इतर पालेभाज्यांपेक्षा तुलनेत भेंडीच्या दरात घसरण झाली. मागील आठवड्यात भेंडी ३५ रुपये, तर या आठवड्यात २५ रुपये किलो दराने विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय इतर पालेभाज्यांच्या दरात किंचित चढ-उतार झाले.
सध्या बाजारात पत्ताकोबी १५० ते १७० रुपयांना प्रति १० किलो, टोमॅटो २० ते ३० रुपये किलो, कोथिंबीर १४० ते १५० रुपये कॅरेट, सिमला मिरची १२० ते १५० रुपये प्रति १० किलो, असे दर होते. बाजारात मागील आठवड्यात भेंडीचे दर ३५ रुपये प्रतिकिलो होते. यावेळी त्यात १० रुपयांची घट होऊन २५ रुपये प्रतिकिलो दर झाले. याशिवाय हिरवी मिरची २५ रुपये प्रतिकिलो दर होते. बटाटे १५ ते २० रुपये किलोने विक्री झाले. अद्रक, लसूण, कांद्याचे दर स्थिर होते. किरकोळ बाजारपेठेत सर्व भाज्यांच्या किमतीत साधारणपणे ५ ते १० रुपयांचा फरक पडत असतो.