जालना : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हा ग्रंथालयातील भोंगळ कारभारविरोधात शुक्रवारी जिल्हा ग्रंथालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.जालना येथील जिल्हा ग्रंथालयात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, ग्रंथालयात बंद असलेले फिल्टर दुरुस्त करण्यात यावे, ग्रंथालय सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात यावे, ग्रंथालयातील बंद असलेले सर्व फॅन दुरुस्त करण्यात यावे, ग्रंथालय परिसरात दररोज स्वच्छता करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना अभाविपने निवेदन दिले होते. परंतु, निवेदनाची दखल घेण्यात आली नाही.यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या मागण्याची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी अमित आर्य, विक्रम राऊत, किशोर मोरे, मारोती कल्याणकर, आकाश चापाकानडे, वेदांत खैरे, साक्षी मुळे, पूजा खडेकर, प्रथमेश कुलकर्णी, अविष्कार इंगळे, समाधान कुबेर यांची उपस्थिती होती.अभाविपच्या वतीने यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक आंदोलने केली आहेत.
जालना : ‘अभाविप’चे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:22 AM