जालना : मित्राची वाढदिवसाची पार्टी करुन पायी निघालेल्या दोघांवर प्रितीसुधानगर येथील गेट ३ जवळ गुरुवारी रात्री आठ वाजता अज्ञाताने हल्ला केला. हल्लेखोराने अनिल क-हाळे (१९, रा. नळगल्ली, नवीन जालना) याला भोसकले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर यश कन्नू भुरेवाल हा जखमी झाला. यामागील कारण मात्र उशिरापर्यंत कळू शकले नाही. या प्रकरणात एका संशयितास ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.वाढदिवसाच्या पार्टीतून हा युवक अचानक निघून गेल्याची चर्चा सदर बाजार पोलीस ठाणे परिसरात जमलेल्या नागरिकांमध्ये होती. या संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक तसेच अन्य पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडे कुठलीच ठोस माहिती नव्हती. सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव राऊत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंद केला नव्हता.
जालन्यात युवकाचा खून अन्य एक जखमी, एक जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:04 AM