रक्तदान काळाची गरज
कोरोनामुळे सर्वत्र रक्ताची टंचाई जाणवत आहे. ही बाब लोकमत परिवाराने हेरली. या आधी देखील विविध सामाजिक कार्यात लोकमतने सहभाग घेऊन ती यशस्वी केली आहेत. त्यापेक्षा अधिक हे रक्तदान शिबिर यशस्वी होईल, असा विश्वास आहे. त्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी यात सहभागी होऊन रक्तदान करावे.
रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री
---------------------------------------------------------
काँग्रेसकडून सर्व ते सहकार्य
लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवाराने जे रक्तदानाचे अभियान हाती घेतले आहे, ते निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यात काँग्रेस पक्षाकडून सर्व ते सहकार्य करण्यात येणार आहे. यासाठी आपण स्वत: आणि नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल या देखील मदत करणार आहेत.
आ. कैलास गोरंट्याल, जालना
----------------------------------
स्तुत्य उपक्रम
लोकमतने नेहमीच सामाजिक भान जोपासले आहे. लोकमतने जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात शिवसेनाही तेवढ्याच ताकदीने मदत करेल. यासाठी आपण स्वत: पुढाकार घेणार असून, रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व ते सहकार्य करणार आहोत.
अर्जुन खोतकर, माजी मंत्री तथा बाजार समितीचे सभापती
---------------------------------------------
रक्तदान शिबिर म्हणजेच सामाजिक भान
लोकमत परिवारातर्फे नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ ते १५ जुलैदरम्यान रक्ताचं नातं या उपक्रमातून संपूर्ण राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यात आमच्या एसआरजे पित्ती उद्योग समूहाचे श्री ओम स्टील यात सहभागी होणार आहे. राज्यातील आमचे विविध डीलर तसेच सबडीलर देखील या रक्तदान शिबिरास त्या-त्या गाव तसेच शहरांमध्ये मदत करणार आहेत. तसेच आमच्या जालन्यातील कंपनीत देखील भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. हा स्तुत्य उपक्रम आम्ही सर्व जण मिळून यशस्वी करू.
रवींद्र पित्ती, संचालक एसआरजे स्टील उद्योग समूह, जालना
----------------------------------------------------------
कोविड काळात रक्तदानाचे महत्त्व पटले
कोरोनाने संपूर्ण जग हादरवले आहे. यामुळे परिवार आणि नात्यांचे महत्त्व अधिक घट्ट झाले आहे. त्यातच लोकमत वृत्तपत्र समूहाने लोकमतचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ ते १५ जुलैदरम्यान संपूर्ण राज्यभर महारक्तदान शिबिर आयोजित केले आहे. त्यात आपण स्वत: तसेच माझे वडील रमेशभाई पटेल आणि विक्रम टी. प्रोसेसरचा सर्व राज्यातील परिवार म्हणजे आमचे डीलर, सबडीलर, कर्मचारी हे देखील यात सहभागी होणार आहेत. या लोकमतच्या उपक्रमात आम्ही सर्व जण प्रत्यक्ष सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करू.
भावेश पटेल, व्यवस्थापकीय संचालक विक्रम टी. प्राेसेसर, जालना