लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील आयसीटीच्या विद्यार्थ्यांना आता स्पेनमधील जगप्रसिध्द स्पेनमधील कॅस्टेलिया ला मंचा विद्यापीठातील सायंन्स लॅबमध्ये नॅनो टेक्नालॉजी संदर्भातील संशोधन आणि शिक्षण घेता येणार आहे. यासह औरंगाबादेतील एमआयटी आणि जालन्यातील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयातही आयसीटीच्या माध्यमातून एमटेक आणि अन्य इजिनिअरिंगच्या शाखांमध्ये संशोधनाची संधी मिळणार असल्याची माहिती जालन्यातील आयसीटीच्या संचालिका डॉ. स्मिता लेले यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.जालन्यात आयसीटी अर्थात इन्स्टीट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलजी ही देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात जवळपास पहिल्यावर्षी ६० आणि आता दुसऱ्या वर्षी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. जालन्यात ही संस्था सुरू झाल्याने जालन्याच्या शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड रोवला गेला आहे. या संस्थेची स्थापना ही स्वातंत्र्य पूर्व काळात म्हणजेच १९३३ मध्ये स्थापन झाली असून, इंजिनिअरींगमध्ये पीएचडी केलेले पहिले पाच विद्यार्थी हे याच संस्थेचे होते.आतापर्यंत या संस्थेने देशाला अनेक मोठे उद्योजक आणि संशोधक दिले आहेत. परंतु ही शिक्षणाची संधी केवळ मुंबई पुरतीच मर्यादीत न राहता तो मराठवाड्यासह अन्य महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना व्हावा या हेतूने जालन्यात आणि नंतर ओडिशातील भुवनेश्वर येथे आयसीटीने संस्था सुरू केल्या आहेत. या सर्व संस्था आता व्हिडीओ कॉन्फरन्सींगने जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाची प्रवेश प्रक्रिया ही आॅलनाईन झाली असून, विद्यार्थी व पालकांना मुंबईला जाण्याची गरज पडली नसल्याचे डॉ. लेले म्हणाल्या.
जालन्यातील विद्यार्थ्यांना स्पेनमध्ये संशोधनाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 12:43 AM