शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जामखेडमध्ये दोन गटांमध्ये हमरातुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 1:18 AM

अंबड तालुक्यातील जामखेड येथे सोमवारी दुपारी किरकोळ कारणावरून उमेदवारांचे समर्थक असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/ जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथे सोमवारी दुपारी किरकोळ कारणावरून उमेदवारांचे समर्थक असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. जिल्ह्यातील इतर मतदार संघात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.जामखेड येथील मतदान केंद्र क्रमांक २८९ व २८० च्या परिसरात एक मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेला. त्याने एका एजंटाला विचारपूस केली. त्यावेळी दुसऱ्या उमेदवाराच्या समर्थकाने त्या एजंटला धक्काबुक्की केली. यावरून वाद पेटल्याने जमाव झाला होता. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत काही जणांना किरकोळ मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच पोनि अनिरूध्द नांदेडकर, उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. मात्र, या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले होते. जामखेड येथील प्रकार वगळता जिल्ह्यातील इतर मतदार संघात काही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ghansawangi-acघनसावंगीVotingमतदानCrime Newsगुन्हेगारी