लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पर्यटन विकास कार्यक्रमातून जिल्ह्यातील शंभू महादेव, नांगरतास, जांबसमर्थ या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकास कामे होणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे.जालना जिल्ह्यातील या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना व परभणी जिल्ह्यातील विकास कामांच्या शुभारंभ व समाधान शिबिराच्या समारोप प्रसंगी परभणी येथे केले.वित्त व नियोजन विभागाच्या औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील मोठ्या तीर्थक्षेत्रांच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नांगरतास, शंभू महादेव, गोखुरेश्वर, खंडेश्वर, जांब समर्थ या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी करावयाच्या विविध विकास कामांचा आराखाडा तयार करून मंजुरीसाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे सादर करण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षात पुरवणी अर्थसंकल्पात वरील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करून निधीची मागणी करण्यात आली होती.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समितीच्या तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या बैठकीत या आराखाड्यस मंजुरी देण्याची शिफारस करण्यात आली होती.त्यानुसार जांब समर्थसह वरील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तनिवास, धर्मशाळा, अंतर्गत रस्ते, प्रसादालय, स्वच्छतागृहांचे बांधकाम, प्रेक्षकगृह, तलावांचे सुशोभीकरण, रस्त्यांलगत पेव्हर ब्लॉक बसविणे, वॉटर फिल्टर बसविणे, भोजनकक्ष, सभामंडप आदी कामे केली जाणार आहे. कामांचे ई-भूमिपूजन झाल्यामुळे आता खºया अर्थाने या कामाला गती मिळेल, असे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
जांब समर्थ, नांगरतास तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 1:15 AM