शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

जनआक्रोश मोर्चा ते उपोषण; मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण लढ्याची वर्षपूर्ती, असे झाले आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 6:12 PM

५७ लाख कुणबी नोंदी मिळाल्या, पूर्ण न्याय मिळेपर्यंत मराठा समाज मागे हटणारच नाही: मनोज जरांगे-पाटील

जालना / वडीगोद्री : समाजाने उठाव केल्यानेच आज एक वर्षानंतरही मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा त्याच जोमाने सुरू आहे. या लढ्यामुळे मराठ्यांच्या कुणबी नोंदींचा शोध झाला. ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. परंतु, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अंतरवालीसह राज्यातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, यासह इतर मागण्यांबाबत शासनाने वेळाकाढूपणाची भूमिका घेतली आहे. आमचा लढा न्याय मागण्यांसाठी आहे आणि त्या पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.

सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील शहागड येथे असंख्य मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत जनआक्रोश आंदाेलन करीत मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांच्याशी संवाद साधण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी शहागड येथे जनआक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. लाखो मराठा समाज बांधवांनी यात सहभाग घेतल्याने आजही हे आंदोलन सुरू आहे. मराठ्यांच्या ५७ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. परंतु, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अंतरवालीसह राज्यातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, बॉम्बे गव्हर्मेंट, हैदराबाद गव्हर्मेंट, सातारा संस्थानचे गॅझेट लागू करावे आदी मागण्यांबाबत शासनाने वेळकाढू भूमिका घेतली आहे. केवळ समितीला मुदतवाढ देण्याचे धोरण अवलंबिले आहे. परंतु, समाजाच्या उठावामुळे आणि ताकदीमुळेच गत वर्षभरापासून आमचा लढा सुरू आहे. आणखी कितीही दिवस झाले तरी आम्ही आमच्या न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही. समाजाने मोठा त्रास सहन केला असून, त्यांचा वेळ आणि योगदान वाया जाऊ देणार नाही, समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांना जात नसते :आरक्षण ही केंद्र आणि राज्य शासनाची सुविधा असून, ती आम्ही मागत आहोत. त्यात जातीयवाद नाही. मराठा आरक्षणासोबतच आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीही लढा उभा केला जाणार आहे.शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्यावी, २४ तास शेतीला वीज द्यावी, पाणी उपलब्ध करून द्यावे, पिकाला भाव द्यावा आदी मागण्या केल्या आहेत.या मागण्या मान्य न झाल्यास आठरापगड जातींना सोबत घेऊन मिशन २०२४ राबविणार असून, मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना सत्तेतून पायउतार केले जाणार असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले.

...तर आपण राजकीय भाषा बोलणे बंद करू राजकारणात जाण्याची आपल्याला हौस नाही. शासन मागण्या मान्य करीत नाही. त्यामुळे समाजाच्या निर्णयानुसार आपण निर्णय घेणार आहोत. आमच्या मागण्या मान्य केल्या तर आपण राजकीय भाषा बंद करू. परंतु, मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले तर समाज त्यांचा कार्यक्रम लावेल, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

वाशी शहर गाठताच निघाला अध्यादेशमनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २० जानेवारी २०२४ रोजी अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रा सुरू केली होती. ही पदयात्रा २५ जानेवारी राेजी वाशी शहरात पोहोचली. जरांगे पाटील यांच्या या यात्रेची दखल घेत त्यावेळी शासनाने मराठा आरक्षणचा अध्यादेश काढला होता. जरांगे पाटील यांच्या या पदयात्रेने देशाचे लक्ष वेधले होते. यात राज्यभरातील मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.

१४ ऑक्टोबर रोजी झाली विराट सभामनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण लढ्यादरम्यान १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी गावाच्या शिवारात सभा घेतली. जरांगे पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत राज्यभरातील लाखो मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. अंतरवाली सराटी गावच्या शिवारात मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली ही विराट सभा शासनाच्या मनात धडकी भरविणारीच ठरली होती.

पहिलं उपोषण : २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३- १७ दिवसदुसरं उपोषण: २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२३- ९ दिवसतिसरे उपोषण: १० ते २६ फेब्रुवारी २०२४- १७ दिवसचौथे उपोषण: ४ जून ते १३ जून २०२४- १० दिवसपाचवे उपोषण: २० ते २४ जुलै २०२४- ५ दिवस

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना