शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जेसीबीचे चाक डोक्यावरून गेल्याने मजूर ठार; चालकाविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 1:22 AM

अजिंठा ते बुलडाणा या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मंगळवारी भोरखेड्या जवळ जेसीबी पाठीमागे घेत असताना झालेल्या अपघातात मजुराचा दबून मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कधावडा : अजिंठा ते बुलडाणा या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मंगळवारी भोरखेड्या जवळ जेसीबी पाठीमागे घेत असताना झालेल्या अपघातात मजुराचा दबून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली. यात बिहार राज्यातील रहिवासी कुमार अरूण पासवान (वय ३०) हे ठार झाले.या प्रकरणी जेसीबी चालका विरूध्द निष्काळजीपणे वाहन चालवून मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.मंगळवारी धावडा जवळील भोरखेडा फाट्याजवळ काम सुरू असतांना जेसीबीचा (एमच. २० इवाय. ८९६) चालकाने अचानक जेसीबी मागे घेतल्याने काम करीत असलेल्या पासवानच्या डोक्यावरून जेसीबीचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला.दुर्घटना घडताच या कामावर असलेल्या बिहारी मजुरांनी जेसीबी चालकाची चांगलीच धुलाई करून दगडफेक केल्याने मोठा गोंधळ उडाला. संतप्त कामगारांनी रस्त्यावरील वाहतूक रोखून राग व्यक्त करून चालकाला अटक करण्याची मागणी केली.याची माहिती अजिंठा पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर, पोहेकॉ आबासाहेब आव्हाड, अजय मितिगे, रविकिरण भारती, दीपक भंगाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. या गोंधळात जेसीबी चालक गर्दीतून पळून गेला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू