शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

'जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा'; जालन्यात एल्गार सभेसाठी लाखोंची गर्दी

By विजय मुंडे  | Published: November 17, 2023 1:02 PM

सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते सभेसाठी एकाच मंचावर आल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

अंबड (जि.जालना) : आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा.. एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देत आज सकाळी ८ वाजेपासूनच लाखो ओबीसी समाज बांधव अंबड (जि.जालना) येथील आरक्षण बचाव एल्गार सभेसाठी दाखल झाले आहेत.

जालना मार्ग, पाचोड मार्ग, बीड, घनसावंगी मार्गावरून सकाळी ८ वाजल्यापासून सभास्थळी येणाऱ्या नागरिकांचा ओघ सुरू झाला होता. कोणी दुचाकीवरून तर कोणी चारचाकी वाहनातून सभेसाठी अंबड शहरात दाखल झाले होते. सभास्थळी विविध गीते गात आरक्षणाचे महत्त्व विषद केले जात आहे. सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते सभेसाठी एकाच मंचावर आल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या छायाचित्राने वेधले लक्षआरक्षण बचाव एल्गार सभास्थळी येणाऱ्या युवकांच्या हाती स्व. गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र होते.हे छायाचित्र उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. शिवाय एकच पर्व, ओबीसी सर्व यासह इतर घोषवाक्य असलेले फलक हाती घेवून युवक घोषणाबाजी करीत होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्तआरक्षण बचाव एल्गार सभेसाठी लाखो ओबीसी समाज बांधव अंबड शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे वाहन पार्किंगसह समाज बांधवांना सभास्थळाकडे जाण्याचा मार्ग दाखविण्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसरत सुरू होती.

पाणी, अल्पोपहाराची सोयअंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेसाठी येणाऱ्या ओबीसी समाज बांधवांसाठी ठिकठिकाणी पाणी, अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. पाणी, अल्पोपहार वाटपासाठी स्वयंसेवकही काम करीत होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालना