शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

बस रस्त्याच्या खाली; ३० विद्यार्थी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:04 AM

पावसामुळे या रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस रस्त्याच्या खाली गेली होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने ३० विद्यार्थी बालंबाल बचावले.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : पावसामुळे या रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस रस्त्याच्या खाली गेली होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने ३० विद्यार्थी बालंबाल बचावले. ही घटना सोमवारी सकाळी पाथरवाला (बु.) ते कुरण पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका खाजगी शाळेच्या बसद्वारे शहागड, वाळकेश्वर, अंकुशनगर, पाथरवाला बु. ते कुरण येथील विद्यार्थी नेले जातात. ही बस सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेत कुरणकडे जात होती. मात्र, कुरण मार्गावर पावसामुळे झालेल्या चिखलातील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ती बस अचानक रस्त्याच्या खाली गेली. बस उलटण्याचा धोका यावेळी उद्भवला होता. मात्र, बसचालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला आणि बसमधील ३० विद्यार्थी बालंबाल बचावले. दरम्यान, या रस्त्यासाठी २०१६ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कोट्यवधी निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, अवैध वाळू वाहतूक, मुरूम वाहतुकीसह जड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. परिणामी थोडाही पाऊस झाला तर या रस्त्यावर चिखल होत आहे. मात्र, रस्त्याच्या अवस्थेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.महाकाळा - पाथरवाला (बु.) - कुरण- वाळकेश्वर- शहागड रस्ता कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत साडेसहा कोटी रुपये निधी असून, एका कंपनीने हे काम घेतले आहे.मात्र, तीन वर्ष झाले तरी या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते सय्यद तारेख, शहरप्रमुख लक्ष्मण धोत्रे यांनी केला.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीBus DriverबसचालकAccidentअपघात