शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

कानपुडे यांचा पदभार काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 1:17 AM

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केशव कानपुडे यांच्याकडे सोपविण्यात आलेला अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा पदभार काढण्याचे आदेश बजावले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपचे जालना नगर पालिकेतील गट नेते अशोक पांगारकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केशव कानपुडे यांच्याकडे सोपविण्यात आलेला अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा पदभार काढण्याचे आदेश बजावले आहेत.भाजप गट नेते अशोक पांगारकर यांनी अतिरिक्त मुख्याधिकारी पदासाठी जालना पालिकेत अन्य अधिकारी पात्र असताना देखील त्यांच्याकडे पदभार न सोपवता शासनाचे सर्व नियम बाजूला ठेवून केशव कानपुडे यांच्याकडे सदरचा पदभार नियमबाह्यपणे सोपवल्याची तक्रार जिल्हाधिकारी बिनवडे यांच्याकडे २१ जानेवारी रोजी केली होती. चुकीच्या पध्दतीने अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा पदभार सोपवल्याप्रकरणी नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा पांगारकर यांनी व्यक्त केली होती.या तक्रारीची बिनवडे यांनी गांभीर्याने दखल घेत चौकशी केली होती. या चौकशीनंतर सध्या पालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा कानपुडे यांच्याकडे सोपविण्यात आलेला पदभार तात्काळ काढून सदर पदभार उपमुख्याधिकारी महेश शिंदे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. नगर विकास विभागाच्या नियमानुसार करनिर्धारक व प्रशासकीय सेवा या संवर्गातील कर्मचाºयाला अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा पदभार देता येत नाही, असा निर्वाळा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान आपण नियमानुसारच या पदावर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदcollectorजिल्हाधिकारी