दरम्यान, अर्जुन खोतकर बिझनेस सेंटर येथे सुरू करण्यात आलेल्या अलगीकरण केंद्रालाही मंत्री सत्तार यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच येथे रुग्णांसाठी केलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी कार्तिकी गायकवाडचे पती रोनीत पिसे, आई सुनीता गायकवाड, बंधू कौस्तुभ गायकवाड यांनीही यावेळी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. गायकवाड परिवाराचे स्वागत पारंपरिक पद्धतीने अर्जुन खोतकरांच्या पत्नी सीमा खोतकर यांनी केले.
नागरिकांना सुखद धक्का
लसीकरण केंद्रावर काही नागरिक लस घेण्यासाठी आले होते. अचानक टीव्हीवरील लाडकी कार्तिकी गायकवाडला पाहून सर्वांना आनंदाचा धक्का बसला. त्यामुळे साहजिक उपस्थितांकडून कार्तिकीला एखादे गाणे सादर करण्याची फर्माईश झाली नसती तर नवल. या नागरिकांच्या आग्रहा खातर कार्तिकीनेदेखील मान ठेवत घागर... घागर घेऊन ही गवळण सादर करून सर्वांना सुखद धक्का दिला.