लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : येथील केदारेश्वर महाराज यात्रा उत्सव अत्यंत उत्साही वातावरणात परंपरागत नियम जपत साजरा करण्यात आला. यामुळे गेले तीन दिवस गावात सर्वत्र भक्तीमय वातवरण होते.तीन दिवसाच्या यात्रा उत्सावात पहिल्या दिवशी केदारेश्वर महाराजांचा पोशाखाची व अलंकार ढोल ताशांच्या गजरात मंदिरापर्यंत नेऊन महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून परिधान करण्यात आले. दि़ १९ रोजी सकाळी ४ वाजता मंदिरापासून महाराजांच्या पालखीला सुरुवात झाली ही पालखी ढोल ताशांच्या गजरात, फटाकयांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी संपूर्ण गाव दिवाळी प्रमाणे सजले होते. पालखीचे सुवासिनींनी पालखीचे औक्षण कले. पाालखी मिरवणुकीत गावातील महिला,पुरुष, तरुणासह चिमुकले सुध्दा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते़ पालखी मंदिरापर्यंत आल्यानंतर सामुदायिक महाआरती करण्यात आली़ याच दिवशी सायंकाळी नवस केलेल्यांनी बारागाडया ओढण्याचा कार्यक्रम झाला़यात यावर्षी दोनशेहून आधिक भाविक सहभागी झाले होते़ रात्री रात्रभर विविध देवा दिधिकांची पारंपरिक पध्दतीने सोंगे काढण्यात आली़ २० रोजी सकाळी ७ वाजता भवानी मातेची स्वारीची मिरणूक मंदिरपर्यंत गेल्यानंतर भवानीची आरती करून भाविकांनी दाळयारेवड्यांची उधळण करुन यात्रेचा समारोप झाला़