लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध करुन देण्यासाठी मंगळवारी मजुरांनी तालुक्यातील खांडवी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून पाच तास ग्रामपंचायत कार्यालयास घेराव घातला. सरकार दौऱ्यावर जनता वा-यावर या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.मागील सहा महिन्यापासून मनरेगा कामाची मागणी करणा-या मजुरांना कायद्यानुसार मनरेगा चे काम मिळाले नाही, प्रचंड दुष्काळ असतांना मजूरांच्या हाताला कुठेही काम नाही. केंद्रीय कायदा असूनही मनरेगाची कामे मिळत नाहीत. नेमकी दुष्काळात ग्रामसेवक व पंचायत समिती तसेच जिल्हा प्रशासनाने नियोजन न केल्यामुळे आज मजुरांच्या हाताला काम नाही.दुष्काळात किमान १५० दिवस काम देणे हे बंधनकारक आहे परंतु जालना जिल्ह्यात प्रशासनाने खांडवी सहीत एकाही गावात कामाचा साधा सेल्फ निर्माण केलेला नाही. यामुळे कामासाठी मजूरांना भटकंती करावी लागत आहे. तर अनेकजण कामाच्या शोधार्थ शहराकडे जात असल्याने गावच्या - गावे ओसाड पडत आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या जेसीबी मशिनला काम मिळते परंतु दुष्काळात होरपळणा-या मजुर व शेतकऱ्यांना रोजगारहमी चे काम मिळत नाही. सेल्फ मंजुर नसेल तर शेजारील गावात कामे द्यावे असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.मग ४० लाखाची कामे वरफळ मध्ये जेसीबी ने केली परंतु खांडवीतील ५०० मजुरांना काम दिले नाही. गुत्तेदाराच्या जेसीबी ला देऊन सरकार मजुरांना दुष्काळात उपाशी मारत आहे.यावेळी आबा बरकुले, प्रविण शेख, महादेव बरकुल,े शेसाबाई साबळे , उषा भारसाकळे ,चंद्रकला भारसाकळे, सविता भारसाकळे, रुख्मीन भारसाकळे, शारदा साबळे ,आशामती साळवे ,कौसाबाई बाभळकर आदींची उपस्थिती होती.परतूर : आंदोलन करुनही प्रशासनाचे दुर्लक्षखांडवी ते परतूर मजुरांनी पायी चालत मोर्चा काढण्यात आला. तसेच परतूर जालना येथे सतत आंदोलन केले. तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयासमोर अनेक वेळा आंदोलने केली. परंतु दुष्काळ असूनही प्रशासनाकडून मजुरांना कामे उलब्ध करुन देण्यात येत नाही.एकीकडे पालकमंत्री बबनराव लोणीकर सांगतात प्रशासनाला मनेरगाची कामे उपलब्ध करुन देण्याची आदेश दिले आहेत, मात्र याकडे कानाडोळा करण्यात येत ंआहे. संतप्त आंदोलन कर्त्यांची विस्तार अधिकारी युवराज परदेशी व ग्रामसेवक चौधरी यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यास आले.
खांडवीच्या मजुरांचा पाच तास घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:31 AM