शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला; ८६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 7:53 PM

जालना तालुक्यातील एक लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा 

ठळक मुद्दे तालुक्यात ९१ हजार ४२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली.

जालना : मागील दोन महिन्यांपासून तालुक्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १ लाख ६०० हजार ३२० शेतकऱ्यांची ८६ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सततच्या दुष्काळानंतर यंदा जूनच्या सुरूवातीलाच जोरदार पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड उरकली. तालुक्यात ९१ हजार ४२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सतत पाऊस पडत राहिल्याने पिकेही जोमात आली. ऐन मूग व उडिद काढणीला आला अन् तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सतत दहा ते अकरा दिवस पाऊस झाल्याने मूग व उडिदाच्या शेंगांना कोंब फुटले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी महसूल व कृषी विभागास पंचनामे करण्याचे आदेश दिले.  त्यानंतर महसूल व कृषी विभागाच्या वतीने प्रत्यक्ष पंचनाम्यास सुरूवात करण्यात आली. मूग व उडिदाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन व कपाशी या पिकांवर मदार होती. परंतु, गत महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून व सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने तालुक्यातील ८६ हजार ७१३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. यात सोयाबीन २४३८५, कापूस ३१९९३, मका १५२०, ज्वारी २० हेक्टर, बाजरी १२९५, तूर ४९५७, मूग १६६८८, उडीद १०५२ तर १०५२ वरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

५८ कोटी रूपयांची मागणीवरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले. प्रतिहेक्टरी ठरवून दिलेल्या निकषानुसार मदतीच्या मागणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसानीपोटी ५८ कोटी ९६ लाख ५० हजार ९८४ रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल, असे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सांगितले. 

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाFarmerशेतकरी