जालना : एका ६ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना अंबड तालुक्यातील कासलीवाल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. आदित्य विनोद उघडे (६ रा. डावरगाव) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. अंबड तालुक्यातील डावरगाव येथील शीतल विनोद उघडे या सहा वर्षाच्या मुलासह जाऊ रत्नमाला चंद्रमणी उघडे यांना उपचारासाठी मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास अंबड शहरातील कासलीवाल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या होत्या. डॉक्टरांनी गोळ्या आणण्यास सांगितल्याने शीतल उघडे या गोळ्या आणण्यासाठी मेडिकलवर गेल्या. मुलगा आदित्यही त्यांच्या मागे आला. मेडिकल घेतल्यानंतर त्यांनी एका अनोळखी इसमाजवळ आपल्या मुलाला ठेवले. मी मेडिकल देऊन येते, असे म्हणून त्या आत गेल्या. मेडिकल देऊन परत आल्या असता, त्यांना मुलगा व सदरील इसम दिसला नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, त्यांचा मुलगा मिळून आला नाही. त्यांनी याची माहिती कुटुंबीयांना दिली. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांनी आदित्यचा शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही. याप्रकरणी शीतल उघडे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६ वर्षाच्या मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:37 AM