शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

मुलांनो, मैदानावर खेळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:21 AM

मोबाईलवरील खेळांमध्ये गुुंतण्यापेक्षा मुलांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. पालकांनीही जागरुक राहून मुलांच्या भावविश्वाचा विचार करावा, असे प्रतिपादन लेखिका डॉ. छाया महाजन यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मोबाईलवरील खेळांमध्ये गुुंतण्यापेक्षा मुलांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. पालकांनीही जागरुक राहून मुलांच्या भावविश्वाचा विचार करावा, असे प्रतिपादन लेखिका डॉ. छाया महाजन यांनी केले.अ. भा. साने गुरुजी कथामाला (जालना)च्या वतीने रविवारी येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात आयोजित दोनदिवसीय बालकुमार महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.व्यासपीठावर साहित्यिक नरेंद्र लांजेवार, प्रा. बसवराज कोरे, डॉ. रमेश अग्रवाल, डॉ. नारायण बोराडे, सुनील रायठठ्ठा, केशरसिंह बगेरिया, राधिका शेटे , जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, कार्यवाह आर. आर. जोशी, कार्याध्यक्ष जमीर शेख, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, संतोष लिंगायत यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. महाजन म्हणाल्या की, हा बाल व्यक्तिमत्त्व घडविणारा महोत्सव आहे. माणसाने माणसाप्रमाणे वागावे हा संदेश साने गुरुजींनी दिला. साने गुरुजींचे संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य जालना येथील अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने सुरू आहे. मोबाईलमुळे मुले एकलकोंडी होत असून, ब्ल्यू व्हेलसारख्या हिंसक खेळांमध्ये अडकत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मुलांशी गोष्टींच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी मुलांना सकारात्मकतेने वागण्यासह स्वच्छतेचा संदेश दिला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी व स्व. दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर नरेंद्र लांजेवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. स्व. बाबूराव जाफराबादकर शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. भक्ती पवार हिने स्वागतगीत गायले. डॉ. सुहास सदाव्रते यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विद्या दिवटे यांनी सूत्रसंचालन केले. आर. आर.जोशी यांनी आभार मानले. उद्घाटन सत्रास विविध ठिकाणांहून आलेल्या साहित्यप्रेमी नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.मुक्त संवाद कार्यक्रमबालकुमार महोत्सवात अध्यक्षा डॉ. छाया महाजन, उद्घाटक नरेंद्र लांजेवार, कथाकार मुकुंद तेलीचेरी यांनी बालकांशी मुक्त संवाद साधला. नरेंद्र लांजेवार यांनी मुलांना बोलते करुन त्यांच्या पालकांविषयीच्या भावना अभिनयातून समजावून घेतल्या. पुणे येथील कथाकार मुकुंद तेलीचेरी यांनी विनोदी कथा सांगून मुलांना खळखळून हसविले. डॉ. छाया महाजन यांना मुलांनी प्रश्न विचारुन त्यांच्यातील लेखिकेला बोलते केले.बालकुमारांचे कविसंमेलन रंगलेबालकुमार महोत्सवात ज्येष्ठ बालसाहित्यकार उद्धव भयवाल यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमारांचे कविसंमेलन चांगलेच रंगले. कविसंमेलनात अभिषेक बनकर, प्रणिता मेहेत्रे यांनी कवितेतून संदेश दिले. अंजली जुंबड या विद्यार्थिनीने ‘आई’ नावाची कविता सादर करुन उपस्थितांना अंतर्मुख केले.