लोकमत न्यूज नेटवर्कदाभाडी : बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व इतर ठिकाणी असलेल्या शिक्षकांमधील वाद सीसीटीव्ही बसविण्याच्या कारणावरून समोर आला आहे. ११ मार्च रोजी शिक्षकांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले. याबाबत सरपंच तथा भाजपाचे बदनापूर तालुकाध्यक्ष भीमराव भुजंग यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.किन्होळा शाळेतील शिक्षकांनी भांडण करू नये अशा सूचना सरपंच, ग्रामस्थ, पालकांनी एक वर्षापूर्वीच शिक्षकांनी भांडण करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, ११ मार्च रोजी मुख्याध्यापक व काही शिक्षकांमध्ये हाणामारी झाली आहे. शिक्षकांची भांडणे पाहून विद्यार्थी भयभीत झाले आहेत. मुख्याध्यापकांकडे विचारणा केल्यानंतर शिक्षक वेळेवर येत नाहीत. आले तर मोबाईवर बोलतात. रजेचा अर्ज दिल्यानंतर दुस-या दिवशी हजेरी पटावर सही करतात, असे मुख्याध्यापक सांगत असल्याचे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे शाळेत बसविण्याचा निर्णय घेतला होता. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवू नका म्हणून ११ मार्च रोजी संबंधित शिक्षकाने शाळेत येऊन भांडणे केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारानंतर शाळेला ग्रामपस्थांनी टाळे ठोकले असून, वरिष्ठांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे भुजंग यांनी सांगितले.किन्होळा गावचे सरपंच भीमराव भुजंग व त्यांचे सहकारी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या सीईओ निमा अरोरा यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र, सीईओ यांनी बैठकीचे कारण पुढे करीत भेट घेण्यास नकार दिल्याचे सरपंच भुजंग यांनी सांगितले.
किन्होळी जिल्हा परिषद शाळेला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:42 PM