एकूणच या प्रदर्शनात दोन रंगांचा मुळा आकर्षण ठरत आहे. यात मुळ्याचा वरील भाग लाल, तर खालचा भाग पांढरा आहे.
मेलडी कलिंगडला पसंती
उन्हाळा तोंडावर आला असून, कलिंगडाला मागणी वाढणार आहे. त्या दृष्टीने या प्रदर्शनात संशोधन करून मेलडी कलिंगडाचे वाण आणले आहे. हे कलिंगड औषधी गुणांनीयुक्त असून, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. या प्रदर्शनात कंपनीने संशोधित केलेल्या भेंडीच्या वाणालाही पसंती मिळत आहे. या भेंडीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनात ठेवलेली लाल भेंडी इतर भेंडीपेक्षा वेगळी आहे. टोमॅटोचे वाणही जरा हटके असून, याला द्राक्षांसारखा आकार दिला असून, चेरी टोमॅटोदेखील प्रदर्शनाचे आकर्षण आहे.
चौकट
अग्रवाल यांच्या संशोधनाचे मोठे मोल
जालना ही बियाणांची राजधानी आहे. त्यात कलश सीडस्च्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून भाजीपाला संशोधनात मोठी झेप घेतली आहे. ते स्वत:देखील कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षित आहेत. त्याचा लाभ त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केला असल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच म्हणावे लागेल.
अर्जुन खोतकर, माजी मंत्री, तथा सभापती बाजार समिती.