केवळ क्षुल्लक कारणावरून त्यांना कमी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. परंतु कारण काहीही असो वर उल्लेखीत दोन्ही तज्ज्ञ सध्या या लॅबमध्ये नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज किमान ५०० पेक्षा अधिक संशयितांचे नमुने तपासणे आवश्यक आहेत. असे असतांना तेवढे नमुने होत नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे ऐन कोरोना काळात तेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याच जिल्ह्यात अशी स्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, जास्तीत जास्त कोरोना संशियतांच्या चाचण्या व्हाव्यात या हेतूने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांचा दावा आहे. परंतु यात तथ्य नसल्याचे दिसून येत आहे. आज कोविड लॅबमध्ये आरटीपीसीआरचे अहवाल येण्यासाठी कधी कधी २४ तासांपेक्षा अधिकचा वेळ लागत आहे. त्यातच काही चाचण्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्याच आठवड्यात एका वकीलास ते आधी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांना सांगण्यात आले. तर नंतर त्यांना पुन्हा तुम्ही निगेटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली. एकूणच हे एक उदाहरण झाले. अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
चौकट
तज्ज्ञांची नेमणूक करण्याची गरज
आज या कोविड लॅबमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र जाणणारे तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे आहेत त्यांच्याकडून आरटीपीसीआरचे नमुने तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे तातडीने जिल्हा प्रशासनाने तज्ज्ञांची नेमणूक करण्याची गरज व्यक्त होत आहे.