जालना : मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने रविवारी अंबड चौफुली भागात हलगी व डफडे वाजवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, गायरान धारकांच्या नावे गायरानाचे सातबारा उतारे तत्काळ करावे आदी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार निकम यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
यावेळी गणपत कांबळे, कासाबाई शिरगुळे, चंद्रकलाबाई गवळी, सर्जेराव पाटोळे, रमेश दाभाडे, बाबासाहेब पाटोळे, गोपी घोडे, सुनील लाखे, भास्करराव कांबळे, प्रकाश खंडागळे, बाळू काळे, अंकुश खोटे, भानुदास डाखुरे, बळीराम गोफने, रमाबाई डोईफोडे, कमलाबाई भारसाकळे व इतरांची उपस्थिती होती.