जालना : शहरातील जुना मोंढ्यातील एका गॅरेजमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी झालेल्या २० चारचाकी वाहनांचे इंजिन व खुल्या पार्ट्सचा साठा जप्त केला आहे. गोडाऊनचा मालक मजहर नजीर खान (४०, रा. कालीकुर्ती) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ९ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राऊत नगर येथील एका गॅरेजवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला. या गॅरेजमध्ये विविध कंपन्याच्या चारचाकी वाहनाचे १५ पंधरा इंजिन तसेच चारचाकी वाहने खोलुन वाहनांचे खुले भाग आढळून आले. त्यानंतर मजहर नजीर खान याला आरटीओ परवानगी बाबत विचारणा केली असता, त्यांने परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. दरम्यान, शनिवारी या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या गॅरेजमध्ये १५ विविध कंपनीच्या चारचाकी वाहनाचे इंजिन, गेअर बॉक्स, इजिन हेड, सेल्फ स्टॉटर, रेडीअेटर, कंन्डेनसर यासह इतर विविध सुट्टे भाग असा एकूण ९ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, पोना सॅम्युअल कांबळे, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, सागर बासिस्कर, रंजित वैराळ, पोकॉ. सचिन चौधरी, विलास चेके, परमेश्वर धुमाळ, संदिप मांन्टे, लखनसिंग पचलोरे आदींनी केली.