शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

‘सगेसोयरे’मुळे ओबीसीच नव्हे तर एससी, एसटी आरक्षणावरही गदा; हाकेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 9:05 AM

ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाही, तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता, अशी टीका हाके यांनी यावेळी सरकारवर केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : ‘सगेसोयरे’चा अध्यादेश लागू झाला तर फक्त ओबीसी बाधित होत नाही, तर एससी आणि एसटी यांच्या आरक्षणावर पण गदा येते. शासन जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही हे लेखी सांगत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला.

ओबीसी आरक्षण बचावसाठी हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा मंगळवारी सहावा दिवस होता. यावेळी हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही? हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगावे. तसे उत्तर लेखी द्यावे. ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाही, तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता, अशी टीका हाके यांनी यावेळी केली.

प्रकाश आंबेडकरांनी केली विचारपूस- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याशी फोनवर चर्चा केली. - शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही आंदोलकांशी फोनद्वारे चर्चा करून विचारपूस केली. - उद्धवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वडीगोद्रीत उपोषणस्थळी हाके व वाघमारे यांची भेट घेतली.

मनोज जरांगे यांना दिले आव्हानआम्ही कोणत्या नेत्याला टार्गेट केले नाही. आम्ही कायदा तोडून काहीही केले नाही. यांना ओबीसी कोण हे माहिती आहे का? अशी टीका हाके यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यावर केली. तसेच माझ्या समोर चर्चेला बसावे, मी सर्व उत्तरे देतो, असे खुले आव्हानदेखील जरांगे यांना हाके यांनी दिले.

पाणी पातळी खालावली- ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची  सकाळी तपासणी केली.- दोन्ही आंदोलकांचे ब्लड प्रेशर चांगले आहे, मात्र पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे चक्कर येत आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याचे, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण