जालना : लग्नसराई सुरू झाली आहे. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांची पहिली पसंती एसटी महामंडळालाच आहे. यंदाही एसटी महामंडळाच्या बसेसची बुकिंग सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामात सुमारे २०० पेक्षा अधिक बसेसची बुकिंग होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.लग्नातील वºहाडाची वाहतूक करण्यासाठी एसटीला प्राधान्य दिले जाते. यंदाची लग्नतिथी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात बसेसची नोंदणी होणार आहे. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत दाट लग्नतिथी आहेत. लग्नानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी वधू तसेच वर पक्ष एसटीला प्राधान्य देतात.जालना, अंबड, जाफराबाद व परतूर आगारातून एसटीची मागणी वाढते. तीन महिन्यात २०० बसेस बुकिंग होतील, असा अंदाज आहे. यावर्षी मात्र, दुष्काळामुळे बसेसच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे. काही वर्षांत खाजगी वाहनांची संख्या तसेच ट्रॅव्हल्समुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. मात्र यात एसटीने आपले वेगेळे असित्व टिकवून ठेवत, सुरक्षित प्रवास व ग्राहक हित लक्षात घेऊन ग्राहकांच्या सेवेत आहे.एसटी महामंडळ ५० ते ५५ रूपये प्रति किलोमीटरला पैसे आकारते. २४ तास जर गाडी वापरली एका दिवसाचा किराया आकारला जातो. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नात ही वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान लग्नसराईत मोठ्या प्रमाणात बसेसची नोंदणी झाल्यास त्याचा इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.लग्नसराईनिमित्त एसटी महामंडळाने आणखी नवीन बसगाड्यांची खरेदी करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
सुरक्षित प्रवासासाठी लालपरीलाच पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:19 AM
लग्नसराई सुरू झाली आहे. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांची पहिली पसंती एसटी महामंडळालाच आहे. यंदाही एसटी महामंडळाच्या बसेसची बुकिंग सुरू झाली आहे.
ठळक मुद्देलग्नसराई : व-हाडीमंडळीची एसटी महामंडळाकडे विचारपूस सुरू