शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

वृद्धाचे हातपाय बांधून मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:37 AM

एका ५० वर्षीय वृध्दाचे हात-पाय बांधून चोरट्यांनी त्यांच्या घरातून वीस सोयबीनच्या गोण्यांसह तीन बकऱ्या व रोख रक्कम अडीच हजार असा एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घनसांवगी तालुक्यातील शिंदखेड येथे गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देघनसावंगी : रात्रीतून २ ट्रकसह ५ आरोपी ताब्यात, सेनिस्टाईल केला पोलीसांनी केला पाठलाग

घनसावंगी : एका ५० वर्षीय वृध्दाचे हात-पाय बांधून चोरट्यांनी त्यांच्या घरातून वीस सोयबीनच्या गोण्यांसह तीन बकऱ्या व रोख रक्कम अडीच हजार असा एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घनसांवगी तालुक्यातील शिंदखेड येथे गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, रात्रीतूनच पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेवून ५ जणांना जेरबंद केले.अनिल बिसराम शिंदे (४२, रा. तेरखेडा ता. वाशी, जि. उस्मानाबाद), राजेंद्र भास्कर काळे (३८, रा. अंधोरा ता. वाशी) व तीन अल्पवयीन आरोपी असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.घनसावंगी येथील शिंदखेड शिवारातील शेतवस्तीवरील पत्राच्या शेडमध्ये लक्ष्मण आश्रुबा सावंत (५०) हे गुरुवारी रात्री झोपलेले असताना पाच दरोडेखोरांनी हल्ला करुन त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर त्यांचे हात-पाय बांधून तोडात रुमाल घातला. चोरट्यांनी शेडमध्ये ठेवलेल्या सोयाबीनच्या २० गोण्या, एक दुचाकी, तिन बकºया व रोख रक्कम २५०० रुपये असा एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.दरम्यान, पिंपळगावहुन पेट्रोलिंग करुन येत असतांना पोलीस या ठिकाणाहुन जात होते. पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकुन सावंत हे उड्यामारत रोडवर गेले. त्यानंतर सावंत यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी कर्मचाºयासह या दोन्ही ट्रकचा पाठलाग करुन एक ट्रक आष्टी रोडवर पकडला. त्यानंतर दुसºया ट्रकचा पाठलाग सुरु केला. हा ट्रक माजलगावकडे जात असल्याने पाथरी, माजलगाव व किल्ले धारुर या पोलिस ठाण्यांना याची माहिती देण्यात आली.या सर्व पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करुन किल्ले धारुर येथे हा ट्रक पकडला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोउपनि. एस. एस. बोडखे हे करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सी. डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शिवाजी बंटेवाड, कर्मचारी संदीप विल्मीक पाटील, आत्माराम घुले, बाबासाहेब हरणे, विलास गाढेकर, रंजित खटावकर यांनी केली. या पोलीसांच्या तत्पर कामागीरी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.लक्ष्मण सावंत जखमीचोरट्यांनी मारहाण केल्यामुळे लक्ष्मण सावंत हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी