लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : भूमिहीन कुटुंबांना जमीन, रोजगार, शेतकऱ्यांप्रमाणे दरवर्षी १२ हजार रूपयांचे सन्मान मानधन वाटप करावे, आदी मागण्यांसाठी गुरूवारी परतूर येथील उपविभागीय कार्यालयावर राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.शासन उद्योगपतींचे कर्ज माफ करीत असून, गरिबांना उपाशी ठेवण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्यांचीही तुटपुंजी कर्जमाफी करण्यात आली आहे. सरकारी कर्मचा-यांना मात्र वेतन आयोग लागू केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.भूमिहिन कुटुंबांना वार्षिक १२ हजार रुपये सन्मान धन वाटप करावे, प्रत्येक गावात रोजगार हमीची कामे सुरू करावीत, एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा रद्द करावा, बेघर कुटुंबांना घरकुलांचे वाटप करावे, विधवा, परितक्ता महिलांना विनाअट ३ हजार रुपये पेन्शन लागू करावी, रोजगार हमीच्या कामावर ७५० रु रोजगार द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
परतूरमध्ये भूमिहिनांनी काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:36 AM