शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान कार्यालयाचे उद्घाटन ह. भ. प. भगवान आनंदगडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहननाथ महाराज पैठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. निधी संकलन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत शहरातील व्यापारी बिपीन मल्लावत यांनी १ लाख ११ हजार १११ रुपये देण्याचा संकल्प केला. प्रथम समर्पण राशी ब्रिजमोहन मल्लावत त्यांनी २१ हजार रुपये दिले. श्री बालाजी महाराज अन्नछत्र समिती सदस्य राजकुमार काबरा यांनी २१ हजार, स्वर्गीय अशोक रूपरेलिया परिवारातर्फे दिवेश व बादल रुपरेलिया यांनी २१ हजार रुपये, डॉ. नंदकिशोर देशपांडे परिवारातर्फे २१ हजार, जगन बारवकर परिवारातर्फे २१ हजार, नगरसेवक विष्णू रामाने परिवारातर्फे २१ हजार रुपये, किशोर पटेल परिवारातर्फे २१ हजार, सीमा बंग यांच्यातर्फे २१ हजार, आदर्श गुप्ता यांच्याकडून १५ हजार रुपये याप्रमाणे शहरातील १० श्रीराम भक्तांनी चेकद्वारे आपला निधी हा समर्पण समिती, देऊळगाव राजा यांच्याकडे सुपूर्द केला.
निधी संकलन अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:31 AM