जालना: मनोज जरांगे काय मागणी करतात हे अजून मला कळलेलं नाही. प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते. मागणी कधीच मान्य होणार नाही अशा गोष्टीची ती मागणी करतात. त्यांचे कोण सल्लागार आहेत. हे कळत नाही. जरांगेंच्या आंदोलनामागे खूप मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. जालना येथील एका खासगी इस्पितळात लक्ष्मण हाके यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, कायदा हातात घेऊन निवेदनकर्त्यास काळ फासले जात असेल तर ती झुंडशही आहे, कायद्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तोंडाला काळं फासायच हे चुकीचे, बेकायदेशीर आहे. उच्चशिक्षित माणसाच्या तोंडाला काळ फासण अजिबात योग्य नाही. मात्र त्यांचे अंतर्गत काय वाद आहेत. त्यांच्या कमिटीमधील लोकांमध्ये खूप गोष्टी घडत आहेत. शासनाने याकडे लक्ष घ्यावे. आज तोंडाला काळ फासले उद्या काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क असणे आवश्यक आहे. उपोषणामुळे गावकऱ्यांना त्रास होणे साहजिक आहे, आंदोलन झाली पाहिजेत पण रीतसर मार्गाने व्हावित. आंदोलनामुळे माणसांचे जगणे हराम होईल असे घडू नये, असा सल्लाही लक्ष्मण हाके यांनी दिला. कुणबी दाखल्याची माहिती घ्यासरकारने दिलेल्या कुणबी दाखल्याची विस्तृत माहिती प्रत्येक तालुक्यात प्रत्येकाने घेतली पाहिजे. काही लोक म्हणताय धमाका होणारे आहे. धमाका झाल्यावरच कळेल काय आहे. पण धमाका बेकायदेशीर नसावा. असे लक्ष्मण हाके म्हणाले.
लोकांचा बुद्धिभेद करू नकाविनोद पाटील, सराटे आणि मनोज जरांगे हे तीन लोक आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा धक्का लावत नाही असे म्हणत आहेत. धनगर समाजाचे साडेतीन टक्के आरक्षण ओबीसींच्या बाहेरचे आहे का? धनगर समाज ओबीसीमध्ये येत नाही का? लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करू नका, असे हाके यांनी सांगितले.
जरांगे यानं अभ्यास नाहीमनोज जरांगे यांचा काडीचा देखील अभ्यास नाही, त्यांनी कुठलीही भूमिका मांडताना थोडीशी माहिती घेऊन बोलत जावे. एसटीची लढाई आमची वेगळी सुरू आहे. आमची लढाई सुरू असताना आमच्या ताटातले. आरक्षण हिरावून घेतले जात असेल तर आमचे छोटे छोटे समाज पुढे येणार आहेत. आमच्या धनगर समाजातील नेत्यांमध्ये एकमत असल्याचे हाके म्हणाले.