लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेतर्फे ‘मोफत कायदेविषयक सहाय्यता, सामाजिक न्यायाची प्रक्रिया’ या विषयावर संविधान तज्ज्ञ व मानवी हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह टाऊन हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अॅड. राजपाल शिंदे- राणा व अॅड. स्मिता सरोदे- सिंगलकर यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे मनिष पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन, भारतीय संविधान दिन व महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेतर्फे कविसंमेलन व पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासह शनिवारी जागृती दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमास आ. कैलास गोरंट्याल, राम गायकवाड, भाऊसाहेब गोरे, रमेश देहेडकर, कवी कैलास भाले हे उपस्थित राहणार असल्याचे परिषदेचे मनिष पाटील यांनी सांगितले.
असीम सरोदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:36 AM