लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील सव्वा लाखांवर शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. असे असले तरी बहुतांश शेतकरी व बँकांनी पोर्टलवर अपलोड केलेली माहिती यात तफावत राहिल्याने या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. या त्रुटी दूर करून शेतक-यांची अचूक माहिती पोर्टलवर कशी भरावी, याचे धडे सोमवारी बँक अधिका-यांना देण्यात आले.कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जदार शेतकºयांना माफी व प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी आवश्यक याद्या व रक्कम बँकांना देण्यात आली असून, त्याचे वितरण सुरू आहे. जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले होते. तर लाभार्थी कुटुंबांचा आकडा दोन लाख बारा हजार एवढा होता. पैकी आतापर्यंत दीड लाखांवर शेतक-यांना सव्वानऊशे कोटींची कर्जमाफी मिळाली आहे.
माहितीच्या जुळवाजुळवीसाठी बँक अधिका-यांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:46 AM