लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात जवळपास ३४७ धोकादायक इमारती आहेत. आतापर्यत या इमारतीच्या दुर्घटनेत पाच वर्षांत भिंत पडून चार जणांचे बळी गेले आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाने वेळीच धोकादायक इमारतीकडे लक्ष दिले असते तर कदाचित दुर्घटना टाळता आल्या असत्या असे नागरिकांचे म्हणणे आहे.जालना शहर प्राचीन शहर म्हणून ओळखले जाते. जुना जालना आणि नवीन जालना असे शहराचे दोन भाग पडले आहेत. दक्षिणेला जुना जालना तर उत्तरेला नवीन जालना वसले आहे.जुन्या जमान्यातील धान्यांची बाजारपेठ म्हणून सुध्दा शहराची ओळख आहे. मराठवाड्यासह विदर्भातील बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा परिसरातील अनेकजण शहरात बाजारासाठी येत असल्याचे जुने लोक सांगतात. त्या काळात अनेक जुन्या इमारती बांधण्यात आलेल्या होत्या कालांतराने त्या जिर्ण झाल्याने हा मुद्दा पुन्हा एैरणीवर आला आहे.धोकादायक इमारतींचे पुढे काय?शहरातील जुना जालना आणि नवीन जालना येथे जुनी इमारत कोसळून झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेत चार जणांचा बळी गेला शहरात ३४७ इमारती धोकादायक अवस्थेत असून, त्या कधीही कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच शहरातील जुन्या वेशींची सुध्दा दुरवस्था झाली आहे. त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.तज्ज्ञ काय म्हणतात?जालना शहरात अनेक प्राचीन इमारती आहेत. यातील काही इमारती आजही चांगल्या अवस्थेत आहेत. परंतु ज्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांचे सर्व्हेक्षण होऊन तातडीने स्ट्रक्चरल आॅडिट जालना पालिकेने केले पाहिजे.- देवेंद्र खेरूडकरस्थापत्य अभियंता, जालनास्ट्रक्चरल आॅडिट करणारशहरातील जुना आणि नवीन जालना परिसरात असलेल्या ३० वर्ष तसेच त्यापेक्षा जून्या इमारतीचे नगरपालिका प्रशासनाकडून लवकरच स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित माहिती घेत आहोत, पावसाचे दिवस असल्याने धोकादायक इमारतीपासून नागरिकांनी सावध राहावे.- नितिन नार्वेकर, मुख्याधिकारी न.प.
धोकादायक इमारतींकडे पाठ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:40 AM