लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध देशातील २६ देशातील दहा युवकांची जागतिक शांतता दूतांचा चमू लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या युथ एक्सजेंच कार्यक्रमांतर्गत एक महिन्याच्या भारत भेटीवर आला आहे.आजचे युवक हे उद्या आपआपल्या देशाचे नेतृत्व करणार आहे. या भावनेतून तसेच शांती व आंतरराष्ट्रीय समस्या कमी करण्यासाठी व युवा शांततादूत बनण्याचा पाया रचण्यास प्रोत्साहन देण्याचा उद्देश ठेवून लायन्स क्लब इंटरनॅशनलने हा कार्यक्रम आखला आहे. १९६१ पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या पंधरा दिवसांत हे युवक यजमान देशाची पारिवारिक संस्कृती, राहणीमान, कुटुंबव्यवस्था व इतर गोष्टींचा अनुभव आपल्या तेथील वास्तव्यास प्रत्यक्षपणे घेतात. या युवकांना इतर संस्कृतीमध्ये जीवन अनुभवण्याचा व प्रदेशात प्रवास करुन जगाची नवीन समज प्राप्त करण्याची संधी या लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या कार्यक्रमाने मिळते. नंतरच्या पंधरा दिवसाच्या वास्तव्यात हे युवक लायन्स क्लबच्या विविध प्रांतांनी आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये व विविध क्लबला भेट देण्यास जातात. या अशा कार्यक्रमामुळे युवकांना इतर देशाच्या संस्कृतीविषयीही आदर निर्माण होऊन जागतिक शांततेचे बीज रोवले जाते.जवळपास सोळा देशातील १० युवक व १६ युवती असे २६ युवा तीन दिवसीय भेटीवर येत आहेत.पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या पाठपुराव्यास यशपुरुषोत्तम जयपुरिया व त्यांच्या चमूने लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या युथ एक्सचेंज प्रोग्रामद्वारे विविध देशातून येणाऱ्या परदेशी युवकांना आपल्या प्रांत ३२३४ एच २ च्या भेटीसाठी आणावे, याचा पाठपुरावा वेळोवेळी प्रांतीय बैठकीमध्ये केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन प्रांतच्या नेतृत्वाने या गोष्टीला मान्यता दिली. त्यामुळेच २६ परदेशी युवा मराठवाड्याच्या संस्कृतीचे अवलोकन करण्यासाठी व पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी औरंगाबाद व जालना येथे तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी येत आहेत. याच कार्यक्रमाअंतर्गत गेल्यावर्षी जयपुरिया यांनी मुलगा हर्ष जयपुरिया याला अमेरिकेला पाठविले होते.
लायन्स क्लब इंटरनॅशनलचे शांततादूत जालन्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:52 AM