शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

लायन्स क्लबची इंटरनॅशनल ‘आलेख परिषद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:11 AM

लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २, विभाग चारची विभागीय आलेख परिषद शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता येथील मधुर बँकेट हॉलमध्ये होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २, विभाग चारची विभागीय आलेख परिषद शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता येथील मधुर बँकेट हॉलमध्ये होत आहे. या विभागीय परिषदेस इंटरनॅशनल डायरेक्टर ला. एन्डोर्सी नवल मालू, ला. प्रांतपाल संदीप मालू, प्रथम उपप्रांतपाल ला. संजय व्होरा व द्वितीय उपप्रांतपाल ला. नितीन बंग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.लायन्सच्या विभाग चारमध्ये जवळपास १९ क्लब असून, सुमारे सातशे सदस्यसंख्या आहे. पैकी बहुतांश सदस्य या परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती चेअरपर्सन एमजेएफ पुरुषोत्तम जयपुरिया यांनी दिली. परिषदेत क्लबमार्फत घेतल्या गेलेल्या समाजसेवी प्रकल्पांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच सर्व क्लबचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांनी त्यांच्या काळात समाज उपयोगी प्रकल्प राबवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. लायन्स क्लब जालनाचे चार्टर मेंबर सुरेश अग्रवाल, परभणी लायन्स क्लबचे चार्टर मेंबर पूनमचंद मुथा, अमित खालापुरे यांनी आजपर्यंत लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी जे योगदान दिले, त्यासाठी त्यांचा विशेष सत्कार यानिमित्ताने करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विविध वैयक्तिक बक्षिसे, क्लबसाठी विविध बक्षिसे, विभागातील १९ क्लबच्या अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्षांसाठी स्पर्धा, लायन्स सदस्यांसाठी ५१ लकी ड्रॉची बक्षिसे या कार्यक्रमात देण्यात येणार आहेत. ही परिषद यशस्वी करण्यासाठी परिषदेचे संयोजक कमलबाबू झुनझुनवाला, गोवर्धन अग्रवाल व विजय दाड व इतर परिषदेच्या कमिटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.रुग्णवाहिकेचे होणार लोकार्पणजालना लायन्स परिवारातील परतूर क्लबचे सदस्य मनोहरराव खालापुरे व त्यांच्या चमूने वर्षभरात जवळपास ४०० गरीब रुग्णांवर नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया औरंगाबादेत लायन्स हॉस्पिटल येथे केल्या. लायन्स क्लबने प्रवास व राहण्याचा खर्चही उचलला. गरीब रुग्णांच्या प्रवासाची अडचण लक्षात घेऊन लायन्स परिवारातील काही सदस्यांनी ९ लक्ष रुपयांचा निधी जमा करुन एक रुग्णवाहिका विकत घेतली. त्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा या परिषदेच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.