जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र जिल्ह्यातील शेतक-यांची यादी एकाचवेळी जाहीर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी बँक अधिकारी व तालुका समितीच्या माध्यमातून नियोजन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.कर्जमाफीस पात्र शेतक-यांची नावे आपले सरकार वेबपोर्टलवर लाभार्थी यादीमध्ये अप्रूव्ह म्हणून इंग्रजित दाखविण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील सहा हजार १५५ शेतक-यांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, अद्याप एकाही शेतक-याच्या कर्जखात्यामध्ये प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या शेतक-यांची नावे कागदपत्रांमधील त्रुटीमध्ये ग्रीन यादीत आलेले नाही. अशी नावे पिवळ्या यादीत तर कर्जमाफीस तात्पुरते अपात्र शेतक-यांची नावे लाल यादीत दाखविण्यात येणार आहे. मात्र, ग्रीन यादी व्यतिरिक्त अन्य दोन्ही याद्या कुठेच पाहण्यासाठी उपलब्ध नाहीत. शिवाय मोजक्याच शेतक-यांची नावे ग्रीन यादीत दिसत आहेत. कर्जमाफीस पात्र सर्व शेतक-यांची नावे एकाच वेळी वेबपोर्टलवर उपलब्ध करून देण्यासाठी पात्र शेतक-यांच्या नावांची अंतीम पडताळणी राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागील तीन दिवसांपासून हे काम सुरू आहे. पडताळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी सांगितले.-------------महाराष्ट्र बँकेला सर्वाधिक रक्कमबँक आॅफ महाराष्ट्रला २९०० पात्र शेतक-यांसाठी ३० कोटी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १ हजार ७७ शेतक-यांसाठी ८ कोटी २८ लाख, कॅनरा बँकेला ८१ शेतक-यांसाठी ६० लाख ८३ हजार, बँक आॅफ इंडियातील १ हजार ४२ पात्र शेतक-यांसाठी ७ कोटी २८ लाख, बँक आॅफ बडोदातील ६०७ शेतक-यांसाठी ३ कोटी ६३ लाख, आंध्रा बँकेतील ११६ शेतक-यांसाठी ७० लाख, ओरिएण्टल बँक आॅफ कॉमर्समधील ६४ शेतक-यांसाठी ५१ लाख ६६ हजार आणि ५१ लाख ६६ हजार रुपयांचा प्राप्त झाला आहे.----------------
एकाचवेळी जाहीर होणार शेतक-यांची यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:28 PM