लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : सणासुदीच्या दिवसांमध्ये स्थानिक व्यापारी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतात. परंतु, सध्या ग्राहक आॅनलाईन खरेदीला पसंती देत आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र शहागड परिसरात दिसत आहे.अंबड तालुक्यातील शहागडसह परिसरातील बाजारपेठेत ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. परंतु, मागील काही वर्षांपासून आॅनलाईन खरेदी वाढल्याने सध्या स्थानिक बाजारपेठेत खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.ग्राहक मोबाईल, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर साहित्यांची खरेदी आॅनलाईन करत आहेत. आॅनलाईन वस्तुंची विक्री करणा-या कंपन्या आॅफर देत असल्याने ग्राहकही आॅनलाईन खरेदीला पसंती देत आहेत.ग्रामीण भागातही आॅनलाईन खरेदीराचा ट्रेंड वाढल्याने येथील बाजारपेठेतील व्यापारी सण उत्सवाच्या काळात तोट्यात असल्याचे शहागड येथील एका व्यापा-याने सांगितले. त्यामुळे दिवाळीतही येथील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.आपल्याच दुकानात सर्व व्हरायटीचे आकर्षक कपडे मिळेल. त्यामुळे आमच्याच दुकानात खरेदी करा, असे आवाहन व्हॉट्सअप, फेसबुकवरून व्यापारी करीत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेलच्या माध्यमाचाही वापर करण्याची वेळ व्यापाºयांवर आली आहे. व्यापा-यांनी माल खरेदी करून मोठी गुंतवणूक करून ठेवली आहे. परंतु, दिवाळीतही मालाची विक्री न झाल्याने व्यापारी अडचणीत सापडले असल्याचे चित्र दिसत आहे.
आॅनलाईन खरेदी वाढल्यामुळे स्थानिक व्यावसायिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 1:02 AM