शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

आज हसरं बाळ, सुदृढ बाळ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 11:55 PM

काय, आपल्या बाळाची झोप पूर्ण होत नाही? त्याचे वस्त्र ओलसर असल्याने तो चिडचिडा झाला आहे ? मग याविषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी लोकमत व पॅम्पर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवार दि. ४ आॅगस्ट रोजी ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काय, आपल्या बाळाची झोप पूर्ण होत नाही? त्याचे वस्त्र ओलसर असल्याने तो चिडचिडा झाला आहे ? मग याविषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी लोकमत व पॅम्पर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवार दि. ४ आॅगस्ट रोजी ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मा. फुलंब्रीकर नाट्यगृह येथे दु. ४ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. आई होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. नव्हे तिचा तो नवा जन्मच असतो. त्यानंतर सुरू होते आई- बाळाचे वात्सल्याचे नाते. बाळ जन्मल्यापासून ते स्वत:ची काळजी घेण्याची पात्रता येईपर्यंत त्याची वाढ व विकास यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते.या काळात बाळाच्या संगोपनात, वात्सल्याचा वर्षाव करण्यात माता तहान- भूक, दिवस- रात्र विसरून जाते. बाळाची तब्येत थोडीशी खराब झाली किंवा झोप पुर्ण होत नसेल किंवा तो चिडचिडा झाला तर आईची काळजी वाढते. अनेकदा कपडे ओलसर असल्यानेही बाळची चिडचिड वाढते.अशा वेळेस त्यास पॅम्पर्स पॅन्ट्स घातली तर तो कोरडेपणा अनुभवून निवांत झोपेल. अशा एक ना अनेक समस्या चुटकीसरशी सोडविण्यासाठी खास लोकमत व पॅम्पर्स ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ हा उपक्रम आपणासाठी घेऊन आले आहेत.आपल्या व आपल्या बाळाच्या सुदृढ आयुष्यासाठी या कार्यक्रमाची अनुभूती प्रत्येक आर्ईने घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला एक भेटवस्तू मिळणार आहे. आकर्षक वेशभुषा सादर करणाºया आई आणि बाळाला ‘फॅशन वॉक’ ची संधी भेटणार आहे.महिलांसाठी खेळमहिलांसाठी विविध खेळ- या कार्यक्रमात सहभागी होणाºया महिलांसाठी ‘वन मिनिट गेम शो’ ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या स्पर्धेत विजयी ठरणाºया महिलांना भरपूर बक्षिसे मिळविण्याची संधी मिळणार आहे.सेल्फी प्रदर्शन‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या उपक्रमांतर्गत बाळ आणि आई या दोघांच्या ‘सेल्फी’ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमादरम्यान मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात हे प्रदर्शन भरविण्यात येईल.डॉ. जयंत तुपकरी यांचे मार्गदर्शनया कार्यक्रमांतर्गत बालरोग तज्ञ डॉ. जयंत दत्तात्रय तुपकरी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. औरंगाबाद बालरोग संघटनेचे माजी अध्यक्ष असणाºया डॉ. तुपकरी यांना या क्षेत्राचा २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले असून ते या संदर्भातील त्यांचे अनुभव तसेच बाळाचे संगोपन या विषयी बोलतील.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटHealthआरोग्य