शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

‘लोकमत’तर्फे ग्रामविकासातील शिलेदारांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:58 AM

२० ते २५ शेतकऱ्यांनी एकत्र येवून गटशेती करुन नवीन तंत्रज्ञान वापरले. तर यातून दर्जेदार उत्पन्न मिळेल, असे मत फळबाग तज्ञ तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतीत पाण्याची शास्वती राहिलेली नाही. यातून धोका निर्माण होत असल्याने शेतकरी कोणतेही तंत्रज्ञान खरेदी करण्यास हिंमत करीत नाही. पण, २० ते २५ शेतकऱ्यांनी एकत्र येवून गटशेती करुन नवीन तंत्रज्ञान वापरले. तर यातून दर्जेदार उत्पन्न मिळेल, असे मत फळबाग तज्ञ तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी व्यक्त केले.संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस’चे सोमवारी थाटात वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.दरम्यान कापसे यांनी लोकमतेच भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, सध्या जिकडे- तिकडे लोकमत दिसत आहे.हा आगळा- वेगळा कार्यक्रम लोकमत समूहाने आयोजित केल्याबद्दल लोकमत समूहाचे आभार. अगदी सरळ- साध्या व सोप्या भाषेत लोकमत बातमी देत असून विकासात्मक बातमीवर लोकमतचा अधिक भर असतो.शेतकऱ्यांनी धोका पत्करला पाहिजे. शेतकऱ्यांनी धोका पत्करल्यास चांगल्या उत्पन्नही निघू शकते. असेही त्यांनी सांगितले.भगवान कापसे : सरपंच अवॉर्ड कार्यक्रमात मार्गदर्शनआज परदेशात आपल्यापेक्षा चार पट अधिक उत्पन्न घेतले जाते. ब्राझील देशात हेक्टर ४० क्विंटल कापसाचे उत्पन्न घेतले जाते. आपल्याकडे ५० ते ६० क्विंटल उत्पन्न शेतकरी काढतात; परंतु सरासरी उत्पन्न घटते. मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करावे, सरपंचांनी गावातील शाळा, आरोग्य आदी गोष्टी सुधारण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.तसेच यावेळी कापसे यांनी जायकवाडीच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास शेतीतून जास्त उत्पन्न कशा प्रकारे मिळेल हेही समजावून सांगितले.सरपंचांनी संधीचे सोने करावे : मुकीम देशमुखजि. प. अतिरीक्त मुख्य कार्यकारी मुकीम देशमुख म्हणाले, ७३ व्या घटनादुरूस्तीनुसार ग्रामपंचायतीला मोठे अधिकार प्राप्त झाले आहेत. यामुळे सरपंचांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे, तसेच आज मोठ्या प्रमाणात महिला सरपंच आहेत. परंतु, त्यांच्या कुटूंबातील व्यक्ती कामकाज पाहत असतो. महिलांना मदत केल्यास त्या अधिक चांगले काम करू शकतात. यासाठी कुटूंबातील व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सन १९६२ मधील शाळा पहा आणि आताच्या शाळा पहा, दोन्हीमध्ये फरक दिसेल. गावामध्ये काम करताना कोणत्याही कामात सातत्य ठेवा, आपल्याकडे मोहिम सुरू आहे. तोपर्यंतच काम केले जाते. मोहिम बंद होताच काम बंद पडते. नविन कामांसोबत जुने काम सुरू ठेवण्यासाठी सरपंचांनी सातत्यपूर्ण काम करावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटLokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्