लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यात आंबे बहराची मोसंबीची ऐन मोसमात आली असताना ठिकठिकाणच्या मोसंबी बागेत मोठ्या फळांची गळ होत असल्यामुळे मोसंबी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.गतवर्षीच्या दुष्काळातून अथक प्रयत्नाने तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी फळबागा वाचविल्या. आंबे बहराची मोसंबी झाडावर बहरत असताना बुरशीजन्य रोगामुळे मोठमोठी फळे देठापासून सुटून खाली पडत आहे. फळगळीचे प्रमाण आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडत असल्याने मोसंबी उत्पादक शेतक-यांनी आता कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज असल्याचे बोलले जाते. हातवनचे मोसंबी उत्पादक प्रगतशिल शेतकरी अशोकराव गायकवाड यांनी सांगितले की, मोसंबी साखरे फायदेशीर फळपिक कोणतेच नाही. परंतू, गेल्या दोन - तीन वर्षापासून वेगवेगळ्या कारणाने फळगळीचा सामना उत्पादकांना करावा लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. माली पिंपळगावचे प्रगतशिल शेतकरी गणेश थोरात यांनी सांगितले की, यावर्ष मृग बहर आला नसल्याने आंबे बहराची मोसंबी चांगल्या भावाने विकली जाणार ३० ते ३५ हजार रूपये प्रतिटन मोसंबीस भाव नक्की मिळणार. आता दसरा, दिवाळीत मोसंबीचा आंबे बहर विक्री केला जातो. देठ कुजल्यामुळे आज विक्रीस आलेल्या मोसंबीची फळबाग झाली तर साठ हजाराच्यावर शेतक-यांचे नुकसान होणार आहे. शेती व्यवसाय प्रचंड धोक्यात आला. आता करावे तरी काय, हाच मोठा प्रश्न शेतक-यांना पडला.
मोसंबी फळबाग उत्पादकांचे नुकसान..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:07 AM