जालना : वारंवार सूचना देऊनही अवैध धंदे बंद न करता अवैध धंदे करणाऱ्यांशी ‘सलगी’ ठेवणाऱ्या जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकारी आणि सहा पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी शनिवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी आमदार रमेश कदम यांना जालना न्यायालयात हजेरी लावून परत मुंबईला घेऊन जात असताना आलिशान खाजगी वाहनाचा वापर केल्याप्रकरणी पोलीस नियंत्रण कक्षात नेमणुकीला असलेले सहायक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे आणि पोलीस नाईक रामप्रसाद पहुरे यांना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी निलंबित केले.>चार पोलीस निलंबितउस्मानाबाद : आपापसातील वादातून उमरगा पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री हाणामारी करणाºया राजूदास राठोड, लाखन गायकवाड, मयुर बेले, सिद्धेश्वर शिंदे या पोलिसांना अधीक्षकांनी निलंबित केले़
आरोपीसाठी आलिशान वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 5:15 AM