- संजय देशमुख
जालना जिल्ह्यात चार वेळेस विधानसभेत जाऊन मंत्रीपद भूषविलेल्या बलाढ्य अर्जुन खोतकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भाजपाने तीन जागा व राष्ट्रवादीने एक जागा कायम राखली. तर काँग्रेसला एक जागा मिळाली.
जालना विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांनी मात केली. गोरंट्याल यांचा २५ हजाराहून अधिक मतांनी विजय झाला. सलग चार टर्म राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला घनसावंगी मतदार संघ राजेश टोपे यांनी शेवटपर्यंत चुरशीची टक्कर देऊन अवघ्या तीन हजार मतांनी कायम राखला. मतमोजणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
भोकरदन मतदान संघात भाजपची जागा कायम राहिली असून, संतोष दानवे यांचा ३० हजाराहून अधिक मतांनी विजय झाला. तर राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे पराभूत झाले. बदनापूरमध्ये नारायण कुचे यांनीही आपला गड ताब्यात ठेवला. कुचे यांनी १ लाख ४ हजार ९७१ मते मिळविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे परतूर येथील उमेदवार बबनराव लोणीकर यांचा विजय झाला. काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया यांनी लोणीकरांना तगडे आव्हान दिले होते. मात्र त्यांना विजयश्री खेचता आली नाही.
ठळक मुद्दे 1जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत भाजपने आपले तीन आमदार कायम राखले. 2कैलाश गोरंट्याल यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात संजीवनी मिळाली. राज्यमंत्री अर्जुन खोतकरांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. 3निवडणूक प्रशासनाच्या कासव गतीमुळे निकालाला लागला उशिर. 4पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा लोणीकरांसाठी ठरली मैलाचा दगड. इतर उमेदवारांनाही झाला लाभ. 5मातब्बर नेत्यांच्या सभांनी प्रचारादरम्यान ढवळून निघाला जिल्हा. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा पाहिजे तेवढा प्रभाव पडला नाही.
असे आहेत विजयी उमेदवार भाजप1. बबनराव लोणीकर, परतूर2. संतोष दानवे, भोकरदन3. नारायण कुचे, बदनापूरकाँग्रेस1. कैलाश गोरंट्याल, जालनाराष्ट्रवादी-1. राजेश टोपे, घनसावंगी
अपक्षांची रणनीती ठरली फोल : जालना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्ष वगळता अपक्षांची रणनीती पूर्णत: फोल ठरली.
गोरंट्याल यांची खोतकरांवर मातसंपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जालना मतदार संघात काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांनी खोतकरांवर मोठ्या मताधिक्याने मात केली. गत निवडणुकीत खोतकरांनी गोरंट्याल यांचा निसटता पराभव केला होता.