Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असून काही मतदारसंघांबाबतही घोषणाही केली आहे. जिथं समीकरण जुळेल, त्या मतदारसंघांमध्ये आम्ही निवडणूक लढवू, असं मनोज जरांगे यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं. त्यानुसार बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याचे जरांगे यांनी निश्चित केलं आहे.
विधानसभा उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी आपल्या सहकाऱ्यांची अंतरवाली सराटी इथं बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही जागांबाबत प्राथमिक चर्चा झाली. यामध्ये आपण ज्या जागा जिंकू शकतो, अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला, त्यांचा पराभव करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
ज्या जागा लढवायच्या आहेत, त्याबाबत बोलताना आपण बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या जागांवर उमेदवार द्यायला हवेत, असं मत मनोज जरांगे यांनी मांडलं आहे. त्यामुळे या मतदारसंघांतील प्रस्थापित नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे आणखी काही सहकाऱ्यांशी चर्चा करून आज सायंकाळपर्यंत उर्वरित जागांबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
मनोज जरांगे कोणकोणत्या जागांवर निवडणूक लढवणार? 1) केज,(राखीव )(बीड जिल्हा)2) परतूर, (जालना जिल्हा)3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)4) बीड, (बीड जिल्हा)5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)6) पाथरी,( परभणी जिल्हा)7) हदगाव, (नांदेड जिल्हा)
कोणकोणत्या मतदारसंघांत पाडण्याची मोहीम राबवणार?1) भोकरदन, (जालना जिल्हा)2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)3) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)4) गंगखेड, (परभणी जिल्हा)5) जिंतूर, (परभणी जिल्हा)6) औसा-(लातूर जिल्हा)
कोणत्या मतदारसंघात पाठिंबा देणार?1) बदनापूर राखीव जालना जिल्हा2) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर