जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिक -ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत असून, जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. परिणामी, जालना शहरात शुकशुकाट पाहवयास मिळत आहे.
जिल्ह्यासह शहरात सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आहे. जिल्ह्यातील जाफराबाद, अबंड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, परतूर, मंठा, याठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तर शहरातील अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, मंठा चौफुली यासह आंदोलन सुरु आहेत.
बससेवा बंदचक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून जिल्हाभरातील बससेवा बंद आहे. त्यामुळे जालना बसस्थानकातून एकही बस धावली नाही.
पेट्रोल पंपही बंदआंदोलनामुळे शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंप बंद आहे. परिणामी, वाहनाधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहेत.
घनसावंगी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - अंबड बसस्थानाकातून एकही बस घनसावंगी तालुक्यात आली नाही.- शाळा-महाविद्यालय बंद, तालुक्यातील प्रत्येक गावात कडकडीत बंद- अनेक गावात सामूहिक मुंडन- ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त आहे - विशेष पथक तैनात