शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अभिजीत, शेखमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी किताबाची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:28 AM

पुण्याच्या अभिजीत कटके याने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली

जयंत कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कपुण्याच्या अभिजीत कटके याने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. गत वर्षी भूगाव येथे चॅम्पियन ठरणाºया अभिजीत कटके याने महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकले. आता प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके हा बुलढाणा येथील बालारफिक शेख याच्याशी दोन हात करणार आहे.जालना : महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी विभागातील पहिली उपांत्य फेरीची लढत नाशिकचा हर्षद सदगीर आणि जळगावचा अतुल पाटील हे दोघेही अनुपस्थित राहिले. त्यामुळे अभिजीत कटके व रवींद्र शेडगे यांच्यातील उपांत्य फेरीला महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी विभागाच्या फायनलच्या रुपात झाले. त्यात अभिजीत कटके याने सोलापूरच्या रवींद्र शेडगे याचा पराभव करीत सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावण्याकडे वाटचाल सुरु केली. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाºया अभिजीत कटके याने खप्पा डाव मारताना रवींद्रविरुद्ध दोन गुण वसूल केले. त्यानंतर अभिजीतने ढाक डावावर रवींद्र शेडगे याला चीत करीत फायनलमध्ये प्रवेश मिळवला.महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या माती विभागातील अंतिम सामन्यात बुलढाणाच्या बाला रफिक शेख व रत्नागिरीचा संतोष दोरवड यांच्यात रंगली. संतोषने ढाक मारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा हा डाव रफिकने त्याच्यावरच उलटवताना २ गुण वसूल केले. त्यानंतर बाला रफिकने एकेरी पट काढत प्रतिस्पर्ध्याला मैदानाबाहेर ढकलत आणखी एका गुणाची कमाई केली व गदालोड डावावर संतोषला चीत करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. तत्पूर्वी, महाराष्ट्र केसरी वजनाच्या माती विभागातील उपांत्य फेरीत बुलढाण्याच्या बालारफिक शेख याने पुण्याच्या साईनाथ रानवडे याचा ६-३ गुणाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती तर संतोष दोरवड याने सेमीफायनलमध्ये धडक मारलेल्या यजमान जालन्याच्या विलास डोईफोेडे याला चीत करीत अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केली. बालारफिक शेखने प्रतिस्पर्ध्याला दोनदा बाहेर टाकत आणि नंतर एकेरी पट काढताना प्रतिस्पर्ध्यावर ६-३ अशी आघाडी घेतली. दुस-या उपांत्य फेरीत सांगलीच्या संतोष दोरवड याने लपेट डावावर २ गुण घेत आघाडी घेतली आणि त्यानंतर ७-0 अशी आघाडी वाढवली व नंतर प्रतिस्पर्ध्याला चीत केले. तत्पूर्वी, पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवड याने नगरच्या योगेश पवार याचा पराभव केला होता तर जालना येथील विलास डोईफोडे याने कोल्हापूरच्या संतोष लवटे याचा पराभव केला होता.

टॅग्स :Wrestlingकुस्तीJalanaजालना