Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथे बैठका सुरु आहेत. आज अंतरवलीत मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी, स्वत: मराठा आदोलक मनोज जरांगे पाटील आणि आनंदराज आंबेडकर आंबेडकर एकत्रित आलेले पाहायला मिळाले. या तिनही नेत्यांमध्ये अंतरवलीत बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी यांनी जरांगे पाटील याचे कौतुक केले.
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी म्हणाले, भारताच्या संविधानाप्रमाणे दुसरे कोणते संविधान नाही. संविधानातील प्रत्येक शब्दावर चर्चा होत होती. ती चर्चा त्यांच्या मुलाबाळांसाठी नाही. शेतकरी, मजूर आणि कष्टकऱ्यासांठी करत होते. भारतातील शोषित समाजाच्या चर्चा पार पडत होती. महाराष्ट्राने यामध्ये लिडिंग रोल घेतला होता. ही बाब महाराष्ट्रातील लोकांना समजली पाहिजे. महाराष्ट्रात महापुरुष जन्माला आले. मी उत्तर प्रदेशचा आहे पण मनोज जरांगे मला मराठी शिकवती, मी जरांगे यांना मराठी शिकवेन असंही नोमानी म्हणाले.
"संपूर्ण देशात मनोज जरांगेंची गरज आहे. त्यामुळे हिंदी शिकणे गरजेचे आहे. मी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बोलण्याचा अनुवाद करेन. मनोज जरागेंच्या रुपाने भारताला आधुनिक गांधी-आंबेडकर आणि कलाम मिळणार आहेत,असंही नोमानी म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
दलित, मुस्लीम अन् मराठा एकत्र आलाय हे फायनल...ही आनंदाची वार्ता मराठ्यांमध्ये गेली. मुस्लीम आणि दलित एकत्र आहेत, मराठ्यांचे मतदान विभागले जात होते. आता मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र झाल्याने कुणी आपल्या जागा पाडू शकणार नाही. नेत्याला आणि पक्षाला मतदान करायचं नाही. आमचा शिक्का चालणारच...तुम्हाला शेतकरी, गोरगरिब ओबीसी, मराठा मोठा करायचाय तर एकही मत वाया जाता कामा नये. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ३ दिवस सुट्टी काढायची, गावात मतदानाला यायचे, शांततेत मतदान करायचे आणि माघारी यायचे. ७५ वर्षातून ही संधी मिळाली ती वाया जाऊन द्यायची नाही असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लीम, दलित आणि मराठा समाजाला केले आहे.